रविवार, 14 सितंबर 2008

श्यामची AAi

साने गुरुजी च्या शामची आई पुस्तकावर संस्कार परीक्षा
साने गुरुजीं च्या मानवतावादी विचारांचा प्रचार करणारे चालते बॊलते सजीव स्मारक म्हणून "साने गुरुजी कथामाला" स्थापन झाली. या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाले च्या वतीने कित्येक वर्षापासून शामची आई पुस्तकावर संस्कार परीक्षा घेतली जाते. यंदा ही संस्कार परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात दोन विभागात घ्यावयाचे ठरविले आहे.
पहिला गट : इयत्ता ५ वी ते ७ वी - गुण ५०
दुसरा गट : इयत्ता ८ वी ते १० वी - गुण १००
पहिल्या गटासाठी ’चित्रमय शामची आई’ हे पुस्तक व दुसऱ्या गटासाठी ’शामची आई’ हे नेहमीचे पुस्तक यातून प्रश्नपत्रिका काढली जाईल.
परीक्षेसंबंधी महत्वाची माहीती -
१) ही परीक्षा डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी त्या त्या शाळेत संपन्न होईल.
२) किमान २५ विद्यार्थी ज्या शाळेतून बसतील अशाच शाळांना परीक्षा केंद्र देण्यात येईल.
३) पहिल्या १० विद्यार्थ्याना रोख बक्षिसे दिली जातील. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्रे दिली जातील.

1 टिप्पणी:

Chetankumar Akarte ने कहा…

मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी अन्द्रोइड मोबाईल वर वाचू शकता, अधिक माहिती. http://sahityachintan.com/marathi-book-reader/shyamchi-aai-by-sane-guruji.html